चेन्नई सुपरकिंग्स-गुजरात टायटन्स यांच्यात उद्घाटनाची लढत, गुरू-चेला आमनेसामने
अहमदाबाद : आयपीएलच्या सोळाव्या आवृत्तीला आज शुक्रवारपासून येथे सुरुवात होत असून ‘सोळावं वरीस’ धोक्याचे मानले जात असले तरी ते धोक्याचे न होता शौकिनांसाठी क्रिकेट आणि मनोरंजन यांची ती पर्वणी असणार आहे. मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपरकिंग्स यांनी आजवर या स्पर्धेवर मोठे वर्चस्व राखले आहे. यावेळीही तेच फेव्हरिट असले तरी अन्य संघही जेतेपदासाठी कसोशीने प्रयत्न करणार आहेत. शुक्रवारी विद्यमान विजेता हार्दिक पंडय़ाचा गुजरात टायटन्स व चार वेळचा विजेता महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. एक प्रकारे चेला व गुरू यांच्यातीलच ही लढत होणार आहे. सायंकाळी 7.30 पासून त्याची सुरुवात होईल. त्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स, जिओ सिनेमावरून केले जाईल. आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून हार्दिक पंडय़ाचे 2022 हे पहिले वर्ष होते. पण पहिल्याच प्रयत्नात त्याने नेतृत्वाची चुणूक दाखवित आपल्या संघाला जेतेपद मिळवून दिले. या संघातून खेळणारा शुबमन गिल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे तर लेगस्पिनर रशिद खानची सातत्यपूर्ण कामगिरी आणि स्वतः हार्दिकची अष्टपैलू क्षमता यामुळे गुजरात टायटन्सला पुन्हा एकदा जेतेपदाचे प्रमुख दावेदार मानले जात आहे. डेव्हिड मिलर राष्ट्रीय संघातून खेळत असल्याने तो या सामन्यासाठी उपलब्ध असणार नाही. मात्र मध्यफळीत त्याची उणीव राहुल तेवातिया निश्चितच भरून काढू शकतो, असा लौकीक त्याने मिळविला आहे. केन विलियम्सनला या फॉरमॅटमध्ये आकर्षक खेळाडू म्हणून पाहिले जात नाही. मात्र अवघड खेळपट्टय़ांवर कमी धावसंख्येच्या सामन्यात तो निश्चितच संघाला उपयोगी ठरू शकतो. नेतृत्वाचे कौशल्य, त्यातील खाचाखोचा आपण धोनीकडून शिकल्या असल्याचे हार्दिक नेहमीच सांगतो. तो त्याचा मेंटर असल्याचेही तो सांगतो. पण वयाच्या 42 व्या वर्षी पंधरा आयपीएल खेळण्याचा आणि अनेक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव असलेल्या धोनीकडे आयपीएलमध्ये यशस्वी ठरण्याचे कसब निश्चितच इतरापेक्षा सरस आहे. काही वेळा त्याला अपयशही आले आहे. गेल्या वर्षी सीएसके संघाला प्लेऑफसाठीही पात्र ठरता आले नव्हते. तरीही त्यांच्या प्लॅनिंगमध्ये कोणतीही त्रुटी नव्हती हे कोणीही डोळे झाकून सांगू शकेल. मात्र अपेक्षेप्रमाणे त्याची अंमलबजावणी झाली नाही, ही त्रुटी राहून गेली होती. 16 व्या आवृत्तीमध्ये इम्पॅक्ट प्लेअर हा नवा नियम पहिल्यांदाच सुरू करण्यात आला असून 12 खेळाडू संघातून खेळताना दिसतील. त्यामुळे ही स्पर्धा यावेळी वेगळी असेल. धोनी खूप विचारपूर्वक आपल्याकडे असलेल्या रिसोर्सचा उपयोग करीत असल्याने आव्हानाचा पाठलाग करताना गरज पडल्यास तो स्वतःलाच इम्पॅक्ट खेळाडू बनविण्याची शक्यता आहे. पहिल्या काही सामन्यात हे दिसणार नाही. मात्र दोन्ही संघ या नियमाचा पुरेपूर उपयोग करून घेण्याचा प्रयत्न करतील. चेन्नईकडे बेन स्टोक्स असल्याने प्रतिस्पर्ध्यांना त्याची निश्चितच धास्ती असेल.
हैदराबादाया पहिल्या सामन्यात भुवनेश्वर कुमारकडे नेतृत्व
2023 ाया आयपीएल क्रिकेट स्पर्धेला शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. दरम्यान, या स्पर्धेत सहभागी झालेल्या सन रायझर्स हैद्राबाद संघाया रविवारी होणाऱया राजस्थान रॉयल्स वाद्धाया पहिल्या सामन्यासाठी भुवनेश्वर कुमारकडे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिका ऍडेन मार्करेम यी सनरायझर्स हैद्राबाद संघाया कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पण तो सध्या दक्षिण आफ्रिकेत नेदरलँड्स वाद्धाया दोन सामन्यांया वनडे मालिकेत खेळत असल्याने तो आयपीएलाया पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध होऊ शकणार नाही. मार्करेम 3 एप्रिलला भारतात दाखल होईल. मार्करेमाया गैरहजेरीत सनरायझर्स हैदराबादो नेतृत्व पहिल्या सामन्यात वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार करणार आहे. सनरायझर्स हैदराबादा आयपीएल स्पर्धेतील दुसरा सामना 7 एप्रिल रोजी लखनौ सुपरजायंट्सबरोबर होणार आहे.
संभाव्य संघ
गुजरात टायटन्स : हार्दिक पंडय़ा (कर्णधार), शुबमन गिल, कोना भरत, साहा, विलियम्सन, राहुल तेवातिया, अभिनव मनोहर, शमी, प्रदीप संगवान, आर.साई किशोर, विजय शंकर, साई सुदर्शन, रशिद खान, शिवम मावी, मॅथ्यू वेड, ओडियन स्मिथ, उर्विल पटेल, दर्शन नलकांडे, डेव्हिड मिलर, जोश लिटल, यश दयाल, जयंत यादव, नूर अहमद, अल्झारी जोसेफ.
चेन्नई सुपरकिंग्स : एमएस धोनी (कर्णधार), कॉनवे, रुतुराज गायकवाड, रायुडू, मोईन अली, स्टोक्स, जडेजा, अजिंक्य रहाणे, सिसांदा मगाला, शिवम दुबे, ड्वेन प्रिटोरियस, अभय मंडल, निशांत सिंधू, राजवर्धन हंगरगेकर, मिचेल सँटनर, शुभाम्शू सेनापती, सिमरजीतु सिंग, पथिराना, थीक्षना, भगत वर्मा, प्रशांत सोळंकी, शेख रशीद, तुषार देशपांडे.
सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स, डिस्ने हॉटस्टार, जिओ सिनेमा.