सावंतवाडी / प्रतिनिधी
सावंतवाडी पालिकेचा अग्निशामक बंब आणून आग विझवली
कलंबिस्त मळा येथील रस्त्यावर भव्य दिव्य असा सेल्फी पॉईंट वृक्षाला काल दुपारी अचानक आग लागल्याने हा सेल्फी पॉईंट वृक्ष आगीत होरपळला. या अगोदर गेल्या दोन वर्षांपूर्वी या सेल्फी पॉईंट वृक्षाला आग लागली होती. पण त्यातूनही काही प्रमाणात हा वृक्ष आपली सावली देत होता. मात्र आता या वृक्षाला पुन्हा काल आगीने वेढल्याने हा वृक्ष पूर्णपणे जळून खाक झाला आहे. त्यामुळे कलंबिस्त-शिरशिंगे मार्गावर गावच्या प्रवेशद्वारापासून काही अंतरावर हा वृक्ष सेल्फी पॉइंट म्हणून पंचक्रोशीतच नव्हे तर तालुक्यात आपली ओळख निर्माण करून होता . मात्र हा सेल्फी पॉईंट वृक्ष आता नामशेष झालाआहे . या वृक्षाला अचानक आग लागल्याने सावंतवाडी पालिकेच्या अग्निशामक बंब पाचारण करण्यात आला होता. त्यात पावसाच्या सरी पडल्याने काही प्रमाणात या वृक्षाला आगी पासून वाचवण्यात यश आले. मात्र संपूर्ण वृक्षालाच आग लागल्याने वृक्ष जळून खाक झाला आहे. जिल्हा बँकेचे संचालक रवींद्र मडगावकर, माजी पंचायत समिती सदस्य रमेश सावंत यांनी बंबाला पाचारण केले. तसेच गावातील काही ग्रामस्थांनी ही आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले.