रेपोदर 4.40 टक्के करण्याची आरबीआयची घोषणा
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेपासून आपला रेपोदर कमी ठेवला होता. परंतु आता आरबीआयने आपला रेपोदर अचानक वाढविला आहे. या निर्णयाचा विपरीत परिणाम शेअर बाजारावर दिसला. यामुळे कर्ज महाग होण्यासह कर्जाचे हप्ते भरण्याची रक्कमही वाढणार असल्याचे संकेत या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. या निर्णयामुळे भारतीय भांडवली बाजारात घसरण सत्र मोठय़ा प्रमाणात राहिल्याचे दिसून आले.
आरबीआयने रेपोदर 4.40 टवके करण्याची घोषणा केल्यामुळे भारतीय भांडवली बाजारात दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 1,306.96 टक्क्यांनी घसरत 2.29 टक्क्यांनी प्रभावीत होत निर्देशांक 55,669.03 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा देखील अचानक 391.50 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 16,677.60 वर बंद झाला आहे.
आरबीआयने रेपोदर 0.40 टक्क्यांनी वाढवून दर 4.40 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य स्वरुपात चलनवाढ नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रीय बँकेने हा निर्णय घेतला आहे. मागील तीन महिन्यात महागाई दर वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर बँकेने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अखेर दर वाढवण्याचा निर्णय घेतला. कोणत्याही पूर्व कल्पनेशिवाय निर्णय
कोणत्याही विना पूर्व कार्यक्रमाशिवाय पतधोरण बैठकीत रेपोदरात 0.40 टक्के व सीआरआर सुरक्षित करण्यासाठी 0.50 टक्क्यांच्या वृद्धी चक्कीत करणारी राहिली आहे. हा निर्णय धक्का देणारा आहे. याच दिवशी एलआयसीचा आयपीओ बाजारात बुधवारी खुला झाला आहे. दिग्गज कंपन्यांमध्ये टायटन, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेंट्स, मारुती सुझुकी आणि डॉ.रेड्डीज लॅब यांचे समभाग सर्वाधिक नुकसानीत राहिले आहेत. दुसऱया बाजूला पॉवरग्रिड कॉर्प, एनटीपीसी मात्र लाभात राहिले आहेत.