मुंबई
लॉजिस्टीक्स क्षेत्रातील कंपनी डेलिव्हरीचा समभाग 1 टक्का इतका शेअरबाजारात घसरलेला होता. सदरच्या समभागाचा भाव बुधवारी बीएसईवर 1 टक्का घसरणीसह 339 रुपयांवर आला होता. 28 दशलक्ष समभागांमध्ये व्यवहार झाल्याने समभाग घसरले आहेत. जपानमधील सॉफ्टबँक ग्रुप 600 कोटींचा डेलिव्हरीतील हिस्सा विक्री करणार असल्याचे समजते. या बातमीचा नकारात्मक परिणाम समभागावर जाणवला.