‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपट
प्रसिद्ध दिग्दर्शक करण जौहरचा चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चे अंतिम टप्प्यातील चित्रिकरण सुरू झाले आहे. हे चित्रिकरण काश्मीरमध्ये पार पडणार आहे. यासंबंधी करण जौहरने सोशल मीडियावर माहिती दिली आहे. चित्रिकरणासाठी रणवीर सिंहसोबत आलिया भट्ट देखील काश्मीरमध्ये दाखल झाली आहे. आलियासोबत तिची मुलगी राहा देखील काश्मीरमध्ये पोहोचल्याचे समजते.
या चित्रपटात रणवीर सिंह आणि आलिया भट्ट हे मुख्य भूमिकेत आहेत. तर धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी हे या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहेत. या चित्रपटातील एक गाणे हे यश चोप्रा यांना समर्पित असणार आहे. रणवीर अन् आलिया यांचा यापूर्वीचा चित्रपट यशस्वी ठरला होता. याचमुळे प्रेक्षक या जोडीच्या नव्या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत.
या चित्रपटाचे अंतिम टप्प्यातील चित्रिकरण 1 मार्चपासून सुरू झाले असून ते 10 दिवस चालणार आहे. करण, रणवीर आणि आलिया हे काश्मीरमध्ये दाखल झाले आहेत. या चित्रिकरणावेळी आलियासोबत तिची मुलगी राहा देखील असणार आहे. आलिया भट्ट आणि रणवीर कपूरने 14 एप्रिल 2022 रोजी विवाह केला होता. तर 6 नोव्हेंबर रोजी आलियाने मुलीला जन्म दिला होता.