प्रतिनिधी/ बेळगाव
नवहिंद पतसंस्थेमध्ये शिपाई म्हणून काम करणारे सुनील बायाण्णाचे यांची कन्या श्रुती हिने बारावी सायन्समध्ये 96 टक्के गुण मिळविले आहेत. याबद्दल नवहिंद परिवारातर्फे त्या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये श्रुतीने यश संपादन केल्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. नवहिंद पतसंस्थेमध्ये शिपाई म्हणून तिचे वडील काम करतात. श्रुतीचा याबद्दल नवहिंद संस्थेचे असिस्टंट जनरल मॅनेजर वेर्णेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नवहिंद सोसायटीचे कर्मचारी उपस्थित होते.