शिवाजीनगर येथील कष्टकरी मुलाची बारावीत झेप
प्रतिनिधी/ बेळगाव
मिठाईच्या दुकानात काम करत शिक्षण घेणाऱया मंथन महेश किल्लेकर याने बारावीच्या परीक्षेत 94.33 टक्के गुण मिळविले. वडील रिक्षा चालक असल्याने आपल्या शिक्षणाचा भार त्यांच्यावर नको यासाठी मंथनने शिवाजीनगर येथील एका मिठाईच्या दुकानात काम करत हे यश संपादन केले आहे.
मंथन हा ज्योती कॉलेजचा विद्यार्थी असून लहानपणापासूनच तो शिक्षणात हुशार आहे. दररोज 4 ते 5 तास अभ्यास केल्यामुळे त्याने हे यश मिळविले आहे. कॉलेजमध्येही फावल्या वेळेत तो ग्रंथालयात जाऊन अभ्यास करत असे. कोणत्याही टय़ुशनला न जाता त्याने हे यश मिळविले. कॉलेजच्या शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीमुळे हे यश मला मिळले, असे तो सांगतो.
पुढे बीएस्सी करून चांगली नोकरी करण्याचा त्याचा मानस आहे. मंथनने घेतलेले गुण हे किल्लेकर कुटुंबातील सदस्यांपैकी सर्वाधिक गुण असल्याने ते कुटुंब सध्या आनंदीत आहे. वडिलांच्या मेहनतीचे आपण चीज करू, असे त्याने ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.