मागण्या मान्य झाल्याने आंदोलन मागे
खानापूर : राज्य सरकारी नोकरांना सातवा वेतन आयोग व जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी बुधवार दि. 1 मार्चपासून राज्यभरातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले होते. या आंदोलनात खानापूर तालुक्मयातील सर्व सरकारी नोकरांनी सहभाग घेतल्याने तालुक्यातील सर्व सरकारी कार्यालये, शाळा, विद्यालय व महाविद्यालये बंद होती. सरकारी नोकर संघांनी सकाळी 11 वाजता येथील तहसीलदार कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले होते. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी 17 टक्के अंतरिम वेतनवाढ व तसेच जुनी पेन्शन योजनेसंदर्भात राज्य सचिवांच्या निदर्शनाखाली समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिल्याने राज्य संघटनेने हे आंदोलन मागे घेतले आहे. त्यामुळे तालुका संघटनेनेही हे आंदोलन मागे घेऊन बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून फटाक्यांच्या आतषबाजीत विजयोत्सव साजरा केला. यावेळी कर्नाटक राज्य सरकारी नोकर संघटनेचे खानापूर तालुका अध्यक्ष बी. एम. यळ्ळूर, गौरव अध्यक्ष के. आर. कोलकार, टी. आर. पत्री, सलिम कित्तूर, के. एच. कौंदलकर, प्रभाकर भट, यल्लाप्पा कोलकार, शिवानंद औराद, रमेश कवळेकर, एल. बी. जमादार, विनायक खण्णूकर, सुरेश गडाद, एम. एस. पुजार, सादिक पाच्छापूर, जे. पी. पाटील, शोभा सौंदत्ती आदींसह विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.