पंतप्रधान मोदींच्या हस्ते युवकांसाठी तिन्ही सेनादलांमध्ये प्रवेशाचा मार्ग होणार मोकळा
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताच्या तिन्ही सेनादलांचे आधुनिकीरण आणि व्यापक सुधारणा करण्याच्या दिशेने केंद्र सरकार आज बुधवारी मोठे पाऊल उचलणार आहे. युवकांना तिन्ही सेनादलांमध्ये सुलभरित्या प्रवेश घेता यावा यासाठी ‘टूर ऑफ डय़ूटी’ या अभिनव योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते केला जाणार आहे.
देशाची सेवा करु इच्छिणाऱया युवकांना भूदल, वायुदल आणि नौदलात काम करण्याची संधी या योजनेद्वारे मिळणार आहे. तिन्ही सेनांचे प्रमुख आज बुधवारी एक संयुक्त पत्रकार परिषद घेणार असून याचवेळी या योजनेची घोषणा केली जाणार आहे. सेनादलांमध्ये होणार असलेल्या सुधारणांचीही घोषणा याचवेळी केली जाईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे ही पत्रकार परिषद महत्वाची ठरणार आहे.
चार वर्षे सेनेत काम
पात्र युवकांना भारताच्या तिन्ही सेनादलांपैकी एकात चार वर्षे काम करण्याची संधी या योजनेद्वारे देण्यात येणार आहे. या योजनेद्वारे प्रथम 50 हजार युवकांची भरती केली जाणार आहे. चार वर्षांनंतर या पैकी 75 हजार लोकांना निवृत्त करण्यात येईल. तर 25 टक्के अधिक सक्षम सैनिकांना सेनेतच ठेवण्यात येईल. त्यांना नंतर पदोन्नती मिळण्याचीही शक्यता आहे. चार वर्षांनंतर निवृत्त झालेल्या सैनिकांच्या पुढील करीअरसाठीही सरकार व सेना त्यांना साहाय्य करणार आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत मिळणार संमती
या योजनेला प्रथम आज बुधवारी होणाऱया केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बेठकीत संमती दिली जाणार आहे. त्यानंतरच पंतप्रधान नरेंद्र मोदी या योजनेची घोषणा करणार आहेत. या योजनेची माहिती तिन्ही सेनाप्रमुख त्यांच्या पत्रकार परिषदेत देतील अशी शक्यता आहे, अशी माहिती केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आली आहे.
अशी असेल ही योजना
ड प्रथम ही योजना भूसेनादलात लागू केली जाणार. त्यानंतर ती वायुसेना आणि नौसेनादलांमध्येही लागू केली जाणार.
ड या योजनेअंतर्गत सेनादलांमध्ये चार वर्षे सेवा बजावल्यानंतर युवक अन्यत्र नोकरी करु शकण्याची सोय या योजनेत आहे.
ड या चार वर्षांच्या सेवा काळात युवकांना पूर्ण प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच त्यांची महत्वाच्या स्थानी नियुक्तीही होणार.
ड या योजनेअंतर्गत सैनिक आणि अधिकारी अशा दोहोंचीही नियुक्ती केली जाईल. निवृत्त सैनिकांच्या जागी त्यांची नियुक्ती होईल.