21 व्या शतकात एकत्र कुटुंबांचे वाढते प्रमाण
सुमारे 20 वर्षांपूर्वी अमेरिकन सोशियोलॉजिस्ट वर्न बँग्ट्सन यांनी 21 व्या शतकात अमेरिकेत एकत्र कुटुंब (जॉइंट फॅमिली) व्यवस्था मजबूत होणार असल्याचे म्हटले होते. बँग्ट्सन यांनी कित्येक वर्षांपर्यंत कॅलिफोर्नियातील 300 कुटुंबांच्या पिढय़ांवरील संशोधनाच्या आधारावर हा अनुमान व्यक्त केला होता. परंतु त्यावेळी न्युक्लियर फॅमिली मॉडेललाच आदर्श मानणाऱया अमेरिकेसाठी हा अनुमान चकित करणारा होता.
परंतु आता बँग्ट्सन यांचा अनुमान खरा ठरला आहे. प्यू रिसर्च सेंटरच्या एका अहवालाने यावर शिक्कामोर्तब केले आहे. मागील 50 वर्षांमध्ये अमेरिकेत एकत्र कुटुंबांचे ट्रेंड वेगाने वाढल्याचे अहवालात म्हटले गेले. एकत्र कुटुंबांना मल्टी-जनरेशनल फॅमिली देखील म्हटले जाते, ज्यात एकाच छताखाली अनेक पिढय़ा एकत्र राहत असतात. 1971 नंतर अशा कुटुंबांमध्ये चौपट वाढ झाली आहे.
एकत्र राहणे पसंत
आशियाई विशेषकरून भारतीय, अश्वेत आणि दक्षिण अमेरिकन वंशीय लोकांची ही परिवार व्यवस्था आता श्वेतवर्णीयांमध्येही वेगाने स्थान निर्माण करत आहे. संशोधन पथकाने अनेक पिढय़ा आणि कुटुंबीयांसोबत राहण्याबद्दल विचारले असता 57 टक्के लोकांनी स्वतःचा अनुभव सकारात्मक असल्याचे नमूद केले आहे.
हॉरिझोंटल स्ट्रक्चर उत्तम
प्यू रिसर्चनुसार सुमारे 130 वर्षांनी 2014 मध्ये 18-34 वयोगटातील तरुणाईमध्ये आईवडिलांसोबत राहण्याची शक्यता अधिक मजबूत झाली आहे. 2021 मध्ये हा ट्रेंड अधिकच बळावला आहे. अनेक पिढय़ा असलेली कुटुंब प्रणाली म्हणजे हॉरिझोंटल स्ट्रक्चर उत्तम असल्याचे अमेरिकेचे समाजशास्त्रज्ञ मान्य करू लागले आहेत.