स्पेनमधील गावासाठी 2 कोटीहून अधिक खर्च करावे लागणार
सुंदर घर खरेदी करण्याचे स्वप्न जवळपास प्रत्येकाचे असते, परंतु माणूस स्वतःच्या बजेटनुसार फ्लॅट किंवा छोटय़ा घरातच समाधान मानत असतो. अशा स्थितीत जर कुणी पूर्णच्या पूर्ण गाव खरेदी करण्याची इच्छा बाळगून असल्यास त्याच्याकडे प्रचंड पैसा असायला हवा. परंतु स्पेनमध्ये कमी किमतीत एक गाव मिळत असल्याने अनेक इच्छुक सरसावले आहेत.
सर्वसाधारणपणे ज्या किमतीवर लोक एक बंगला खरेदी करू शकतात, तितक्याच्या रकमेत स्पेनमधील एक गाव विकले जात आहेत. या गावात 44 हून अधिक घरे असून या सर्वांचे मालकी हक्क गाव खरेदी करणाऱयाला मिळणार आहेत. स्पॅनिश गाव कास्त्राs केवळ 2 कोटी 16 लाख 87 हजार रुपयांमध्ये विकले जाणार आहे.
साल्टो डी कास्त्राs हे स्पेन आणि पोर्तुगालच्या सीमेवर वसलेले गाव आहे. हे गाव उंच पर्वतांदरम्यान स्थित आहे. हे गाव आता 30 वर्षांपासून निर्जन असून गावातील इमारती जीर्ण झाल्या आहेत. गावात 44 घरांसह एक हॉटेल, एक शाळा, एक सामूदायिक जलतरण तलाव, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि एक जुना सिव्हिल गार्ड बरॅक देखील अस्तित्वात आहे. गॅलिशिया येथील एका व्यक्तीने साल्टो डी कास्त्राs गावाला 2000 साली पर्यटनस्थळात रुपांतरित करण्याच्या उद्देशाने खरेदी केले होते, परंतु पर्यटनाची योजना अयशस्वी ठरल्याने त्याचे हे स्वप्न साकार होऊ शकले नव्हते.
या गावाला स्पॅनिश वेबसाइट आयडियलिस्टावर नोंदणीकृत करण्यात आले आहे. मी शहरी निवासी असल्याने हे गाव विकत आहे, गावाची देखभाल करणे आता मला शक्य नाही असे याच्या जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे. या गावाला 2,27,000 युरोंमध्ये विकले जाणार आहे. भारतीय चलनात हा आकडा 2 कोटींच्या आसपास होतो. भारतात या किमतीत महानगरांमध्ये मोठा फ्लॅट खरेदी करणेही अवघड आहे.