सर्वांशी वैयक्तिक चर्चा : नगराध्यक्षपदाचा निर्णय राखीव
फोंडा : फोंडा नगरपालिकेवर निवडून आलेल्या भाजपा पॅनलमधील सर्व दहाही उमेदवारांनी बुधवारी पणजी येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांची भेट घेतली. नगराध्यक्ष व उपनगराध्यपदाच्या निवडीबाबत सर्व उमेदवारांशी वैयक्तिक चर्चा कऊन त्यांचा अभिप्राय जाणून घेण्यात आला. अंतिम निर्णय पक्षाच्या वरिष्ठ पातळीवऊन घेण्यात येईल, असे स्पष्ट संकते यावेळी देण्यात आल्याचे वृत्त आहे. या भेटीदरम्यान फोंड्याचे आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक व भाजपाचे प्रदेश सरचिटणिस अॅङ नरेंद्र सावईकर हे उपस्थित होते. रितेश नाईक, रॉय नाईक, विश्वनाथ दळवी, विरेंद्र ढवळीकर, शौनक बोरकर, आनंद नाईक, विद्या पुनाळेकर, ऊपक देसाई, ज्योती अऊण नाईक व दीपा शांताराम कोलवेकर या सर्व दहाही भाजपा उमेदवारांना यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. दरम्यान या पणजी भेटीमुळे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाविषयी जोरदार चर्चा सुऊ झाली आहे. मंत्री रवी नाईक यांच्याकडून नगराध्यक्षपदासाठी रितेश नाईक यांना प्राधान्य देण्यात आले आहे. तर अन्य एका दोघांनी नगराध्यपदावर आपला दावा केला आहे. भाजपा पॅनलने 15 पैकी 10 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले तरी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाचा गुंता सोडविण्याचे आव्हान पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपुढे निर्माण झाले आहे. इच्छुक दावेदारांची मनधरणी व मनपरिवर्तन करतानाच काहीजणांना विविध संस्थांच्या पदांवर नेमणुकीची हमी हा पर्याय अवलंबण्याची शक्यता वर्तवली जाते.