पहिल्या नजरेतच पडली होती प्रेमात
प्रेम आंधळे असल्याचे बोलले जाते. परंतु कधी माणूस एखाद्या निर्जीव गोष्टीवर प्रेम करत असल्याचे ऐकले आहे का? कुणी एखाद्या बाहुलीला स्वतःच्या आयुष्याचा जोडीदार करून घेतो, तर काही जण प्राण्यालाही आयुष्याचा साथीदार करत असतात. इंग्लंडमधील पास्केल सेलिक या महिलेने 2019 मध्ये व्हॅलेंटाइन्स डे वेळी विवाह केला होता. या महिलेने प्रियकर असूनही एका ब्लँकेटशी विवाह केला होता. सिंगल बेड रजईला ती स्वतःच्या एकाकीपणाली साथीदार मानायची आणि तिने पती म्हणून या रजईचीच निवड केली आहे.
या महिलेने या विचित्र विवाहावेळी स्वतःचे कुटुंबीय आणि मित्रांनाही निमंत्रित पेले होते. तसेच तिचा प्रियकर देखील या अजब विवाहात सामील झाला होता. माझ्याकडे अनेक रजई आहेत, परंतु यातील एक रजईवर माझे सर्वाधिक प्रेम आहे. हा विवाह करण्यामागे एक विशेष हेतू होता. लोकांना स्वतःवर प्रेम करणे आणि स्वतःची देखभाल करण्यासाठी जागरुक करू इच्छित होते. तसेच आनंदी राहण्यासाठी कुठल्याही माणसासोबत नात्यात अडकण्याची गरज नसल्याचे सांगू इच्छित होते असे तिने म्हटले आहे.
माझा प्रियकर जॉनीला या विवाहाबद्दल कुठलाच आक्षेप नाही, प्रियकरासोबत विवाह केल्यावर मी माझ्या पहिल्या पतीला म्हणजेच रजईला सोडून देणार नाही. माझी रजई माझ्यासाठी सदैव उपलब्ध असते. या संबंधात रोमांसपेक्षा अधिक मैत्री असल्याचे पास्केलने म्हटले आहे.