हजारो-लाखो जहाजांचा भांडार
जगात एक असे बंदर आहे, ज्याला आता जहाजांची अंत्यभूमी म्हटले जात आहे. तुर्कीयेतील या ठिकाणी हजारोंच्या संख्येत जहाजं अनेक वर्षांपासून आहेत. निवृत्त झालेल्या जहाजांना येथे आणून सोडले जाते.
एकेकाळी जहाजांचा वापर केवळ मालवाहतुकीसाठी केला जात होता. परंतु आता या जहाजांची उपयुक्तता बदलली आहे. आता या जहाजांमध्ये शॉप्स, रेस्टॉरंट, कॅसिनो, पूल्स आणि गेम झोन देखील तयार केले जात आहेत. या जहाजांची मोठी देखभाल करावी लागते. अनेकदा या जहाजांचे मालक त्यांची देखभाल करू शकत नसल्याने त्यांना या बंदरावर आणून सोडतात. यातील काही जहाजांची दुरुस्ती करत त्यांची पुन्हा विक्री करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु बहुतांश जहाजांचे सुटे भाग काढून विकले जातात. उर्वरित हिस्से तेथेच गंजून जात असतात. भंगाराच्या व्यवसायात या जहाजांचा मोठा उपयोग होत असतो. भारतातही अशाप्रकारचे अलंग बंदर आहे, तर बांगलादेशचे चितगाव आणि तुर्कियेचे अलिएगा शिपयार्ड यासाठी जगभरात ओळखले जाते.