येथे ग्राहक स्वतः पकडतात मासे, मगच तयार होते ऑर्डर
तुम्ही कधी कुठल्याही कॅफे किंवा रेस्टॉरंटमध्ये स्वतःसाठीची डिश तयार केली आहे, वाचताना हे विचित्र वाटत असले तरीही काही ठिकाणी हे घडू लागले आहे. सध्या इंटरनेटवर जपानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या रेस्टॉरंटमध्ये ग्राहक स्वतः मासे पकडतात आणि मग त्यांची ऑर्डर तयार केली जाते. रेस्टॉरंटच्या परिसरातच एक तलाव आहे.
![](https://tarunbharat.com/wp-content/uploads/2022/10/japan2-1.jpg)
जपानच्या ओसाकामध्ये रेस्टॉरंटच्या काठावर मासे पकडणे किंवा नौकेत बसून मासेमारी करण्याचा अनुभव मिळतो. ग्राहकाने मासे पकडल्यावर रेस्टॉरंट या कामगिरीचा आनंद व्यक्त करण्याची अनुमती देते. मग पकडलेल्या माशासोबत छायाचित्र काढले जाते आणि मासा शेफकडे पाठविण्यात येतो. हा शेफ ग्राहकाच्या पसंतीनुसार डिश तयार करत असतो.
या व्हिडिओला इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून याला 19 लाखाहून अधिक ह्यूज मिळाल्या आहेत. तसेच 1.2 लाख लाइक्सही प्राप्त झाल्या ओत. ‘जर तुम्ही स्वतः मासे पकडत असाल तर येथे डिश स्वस्त ठरेल. तुम्ही स्वतः पकडलेला माशा डिस्काउंट किमतीवर खाऊ शकता’ असे रेस्टॉरंटने स्वतःच्या वेबसाइटवर नमूद केले आहे. रेड-स्नॅपर माशाची किंमत 1,480 जपानी येन आहे, परंतु ग्राहकाकडून हा मासा पकडण्यात आल्यास तो 1,810 येनमध्ये उपलब्ध होणार आहे.