शिक्षण विभागाकडून परीक्षेच्या वेळापत्रकात बदल : अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना मिळणार वेळ
प्रतिनिधी /बेळगाव
यावर्षी दसरा सुटीनंतर सहामाही परीक्षा घेतल्या जाणार आहेत. शिक्षण विभागाने परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल केला. प्रथमच दसरा सुटीनंतर परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे दसऱयाच्या 14 दिवस सुटीत विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळणार आहे.
यंदा 3 ते 16 ऑक्टोबर दरम्यान दसऱयाची सुटी देण्यात आली आहे. एकूण 14 दिवस शाळांना सुटी देण्यात आली आहे. दरवषी दसरा सुटीपूर्वी सहामाही परीक्षा घेतल्या जात होत्या. परंतु यावषी यामध्ये बदल करण्यात आला असून दसरा सुटीनंतर परीक्षा घेतली जाणार आहे. 17 ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार असून, त्या संपूर्ण आठवडय़ात परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर पुन्हा दिवाळीची सुटी मिळणार आहे. दहावीसोबतच हायस्कूल स्तरावरील सर्वच परीक्षा 17 पासून घेतल्या जाणार आहेत.
17 ऑक्टोबरपासून परीक्षा
बेळगाव जिल्हा माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघातर्फे 17 ऑक्टोबरपासून परीक्षा घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यापूर्वी 24 सप्टेंबरपासून या परीक्षा होणार होत्या. परंतु शिक्षण विभागाने बदल केल्याने परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. 17 ते 22 ऑक्टोबर दरम्यान दहावीची परीक्षा होणार असून, त्यानंतर दिवाळीची सुटी मिळणार आहे.
दहावी सहामाही परीक्षेचे वेळापत्रक
दिनांक | विषय |
सोमवार दि. 17 | प्रथम भाषा (मराठी, कन्नड, इंग्रजी) |
मंगळवार दि. 18 | द्वितीय भाषा (कन्नड व इंग्रजी) |
बुधवार दि. 19 | गणित |
गुरुवार दि. 20 | समाज विज्ञान |
शुक्रवार दि. 21 | तृतीय भाषा (कन्नड, इंग्रजी) |
शनिवार दि. 22 | विज्ञान |