वार्ताहर /शिवोली
मधलेभाट, शिवोली येथे आंब्याचे झाड उन्मळून पडून हजारो रुपयांचे नुकसान झाले. सदर घटना सोमवार दि. 4 रोजी रा. 11 वा. घडली.
प्राप्त माहिनुसार मधलेभाट शिवोली येथील रहिवासी रविंद्र धारगळकर यांच्या घरा शेजारी मोठे आंब्याचे झाड होते. सोमवारी रात्री पडलेल्या जोरदार पावसात अंदाजे रा. अकरा वाजता ते झाड उन्मळून श्री. धारगळकर यांच्या घडावर पडले. त्याबरोबर जवळ असलेले तीन माडसुद्धा मोडले. या घटनेत श्री. धारगळकर यांच्या घराचा कोनसा तसेच पत्रे मोडले. त्यात त्यांचे अंदाजे दहा हजार रुपयांचे नुकसान.
माजी सरपंच शोनाली आगरवाडेकर यांना सदर घटनेची माहिती मिळताच त्यांनी मंगळवारी सकाळी कामगारांना बोलावून स्वखर्चाने आंब्याचे झाड कापून घर मोकळे करुन दिले. त्यांच्या या कार्याबद्दल श्री. धारगळकर यांनी सौ. आगरवाडेकर यांचे आभार मानले.