वृत्तसंस्था/ काबूल
अफगाणिस्तानमध्ये बुधवारी दुपारी 3.15 वाजता 5.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. हा भूकंपाचा केंद्रबिंदू हिंदुकुश भागात असून त्याची खोली जमिनीखाली 188 किमी अंतरावर होती. यापूर्वी बुधवारी सकाळी 9.23 वाजता 4.6 आणि 11.50 वाजता 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. दिवसभरात झालेल्या तीन भूकंपाच्या धक्क्यांमुळे लोकांमध्ये घबराट पसरली होती. सुदैवाने या धक्क्यांमुळे कुठेही मोठी पडझड किंवा जीवितहानी झाल्याच्या घटना घडल्या नाहीत.