बेळगाव : नेपाळ येथील रंगसाला स्टेडियमवरती घेण्यात आलेल्या 30 वर्षावरील वयस्करांच्या आंतरराष्ट्रीय अथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या सुजान जताना हिने थ्रोईंग प्रकारात 3 सुवर्णपदके पटकावित घवघवीत यश संपादन केले. रंगसाला स्टेडियम नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय अथलेटिक्स स्पर्धेत सुजान जतानाने थाळीफेक, गोळाफेक व भालाफेक स्पर्धेत प्रथम क्रमांकासह 3 सुवर्णपदके पटकाविली. गतवर्षी राष्ट्रीय 30 वर्षावरील अथलेटिक्स स्पर्धेत सुजानने 4 सुवर्ण पटकावित निवड समितीचे लक्ष वेधून घेतले होते. भारतीय अथलेटिक्स समितीने आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड केली होती.
Previous Articleदिल्ली पब्लिक स्कूल बेंगळूरकडे सीबीएसई फुटबॉल चषक
Next Article आराधना संघाला सर्वसाधारण उपविजेतेपद
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.