चंदिगड
सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील फरार शूटर दीपक उर्फ मुंडी याला पंजाब आणि दिल्ली पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत जेरबंद करण्यात आले. मुख्य शुटरसह त्याचे दोन साथीदार कपिल पंडित आणि राजिंदर यांनाही सुरक्षा दलांनी अटक केल्याची माहिती पंजाबचे डीजीपी गौरव यादव यांनी शनिवारी दिली. त्यांच्याकडून 11 पिस्तुलेही जप्त करण्यात आली आहेत. अटक करण्यात आलेले तिघेही संशयित लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी अन्य काही जणांचा शोध घेण्यासाठी आणि सबळ पुरावे गोळा करण्यासाठी तपास यंत्रणांकडून वेगवेगळय़ा राज्यांमध्ये अजूनही शोधमोहीम सुरू आहे.