अहाना कुमराला ‘लिपस्टिक अंडर माय बुर्का’, ‘सोना स्पा’, ‘खुदा हाफिज’ यासारख्या चित्रपटांमध्ये पाहिले असेल. अलिकडेच अभिनेत्रीने अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर मुंबईत स्वतःचे घर खरेदी केले आहे. घर खरेदीसाठी प्रचंड मेहनत केल्याचे तिने म्हटले आहे.
मुंबई शहरात प्रचंड संघर्ष केल्यावर स्वतःच्या पैशांनी हे घर खरेदी केले असून याला मी मोठी कामगिरी मानते. घर खरेदी करण्यासाठी स्वतःच्या राहणीमानावरील खर्च कमी केला होता असे ती सांगते. स्वतःचे पुढील लक्ष्य एक कार आणि हॉलिडे होम असल्याचे तिने म्हटले आहे.
6 वर्षांपासून मुंबईत आहे आणि स्वतःच्या घरासाठी मी स्वतःच्या जीवनात अनेक गोष्टींवरून कपात केली आहे. स्वतःचे घर असावे म्हणून जे काही करू शकत होते, ते केले. पैसे वाचविण्यासाठी मी घरातून फारच कमी वेळा बाहेर निघते. मागील काही वर्षांमध्ये कुठल्याच चित्रपटाला मी नकार दिला नाही. या कामामुळेच मी हे घर घेऊ शकल्याचे तिने सांगितले आहे. स्वतःच्या पालकांसोबत नव्या घरात राहू शकते. मी नेहमीच माझ्या आईला स्वतःच्या आस-पास ठेवल्याचे ती म्हणाली. अहानाने 2009 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.