अक्कलकोट प्रतिनिधी
अक्कलकोट शहरातील खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात अभिषेक करत असताना गाभाऱ्याबाहेर ठेवलेल्या पिशवीतील पर्सवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला ही घटना दि १८ रोजी सकाळी घडली. दोन मोबाईल हँडसेट रोख ५ हजार असा ३५ हजार पाचशे रूपयेचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संतोष वामन महाडेश्वर वय 64 राहणार रूम नं 42 बीडीडी चाळ नंबर 11 वरळी मुंबई हे अक्कलकोट शहरातील एसटी स्टँड समोरील खंडोबा मंदिर गाभाऱ्यात अभिषेक करत असताना गाभाऱ्याच्या बाहेर ठेवलेल्या पिशवीतील पर्समधील दोन मोबाईल हँडसेट रोख ५५०० रक्कम असे 35 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरला.
या गुन्ह्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी डीबी पथकातील पो.हे.काँ महादेव चिंचोळकर, पोकॉ गजानन गायकवाड, पो.कॉ/चिदानंद उपाध्ये यांना अज्ञात आरोपीचा शोध घेणे बाबत आदेश दिले.डीबी पथकातील पोलीस अंमलदार हे अक्कलकोट शहरात सदर अज्ञात आरोपीचा शोध घेणेकामी पेट्रोलिंग करीत असताना अक्कलकोट एसटी स्टँड येथे एक संशयित इसम मिळून आला व आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.