डिचोली / प्रतिनिधी
गुजरात राज्यात नोंदणीकृत असलेली व गोव्याची सीमा दोडामार्ग मार्गे उलटू पाहणारी दोन वाहने डिचोली अबकारी खात्याने अडवून त्यातील सुमारे साडेचार लाखांची दारू आणि सदर वाहने जप्त केली. सदर कारवाई रवि. दि. 7 जून रोजी रात्री 9.30 वा. च्या सुमारास करण्यात आली असून या दोन पैकी एका वाहनाच्या चालकाला अटक करण्यात आली आहे. तर दुसऱया वाहनाच्या चालकाने दोडामार्ग चेकनाक्मयावरून पळ काढला असून त्याचा शोध चालू आहे. अशी माहिती अबकारी निरिक्षक हसन खान यांनी दिली.
उपलब्ध माहितीनुसार रविवारी रात्री 9.30 वा. च्या सुमारास जीजे 03 बी डब्ल्यू 0091 व जीजे 16 ए यु 3511 हि दोन वाहने दोडामार्ग चेकनाक्मयावर दाखल होताच अबकारी खात्याच्या अधिकाऱयांनी त्यांना अडविले. व पुढे असलेल्या 0091 या क्रमांकाच्या वाहनातील सामानाची तपासणी करण्यास सुरूवात करताच दुसऱया 3511 या क्रमांकाच्या वाहनातील चालकाने गाडी तेथेच सोडून पळ काढला. त्यामुळे अबकारी अधिकाऱयांना या वाहनावर संशय आला व त्यांनी पुढील वाहनाच्या चालकाला पकडून ठेवले. व दोन्ही वाहनांची झडती घेतली असता पहिल्या गाडीत 17 दारूच्या पेटय़ा आढळून आल्या, तर दुसऱया गाडीत एकूण 329 दारूच्या विविध प्रकारच्या बाटल्या असलेल्या पेटय़ा आढळून आल्या.
त्यामुळे सदर दोन्ही वाहने अबकारी खात्याने ताब्यात घेतली. सदर वाहनांमध्ये या दारूच्या पेटय़ांसह इतरही सामान होते. त्या समानाच्या आड बेकायदा दारूची आंतरराज्य वाहतूक चालल्याचे निदर्शनास आले. पहिल्या वाहनातील दारूची किंमत 78,196 इतकी आहे. तर दुसऱया वाहनातील दारूची किंमत हि 3 लाख 94 हजार इतकी होते. दुसऱया वाहनात भरण्यात आलेली दारू हि गोव्यात विक्री करण्यासाठी नसल्याचे त्यावर नमूद केले गेले असल्याने गोव्यात या लॉकडाउन काळातही बेकायदेशीर दारूचे पेकिंग आणि निर्यात चालू असल्याचा दाट संशय येतो. अबकारी खात्याने त्यादृष्टीने चौकशी सुरू केली आहे.
या प्रकरणात पहिल्या गाडीचा चालक इलियास गोगाविया हरूनभाई (वय 40. रा. राजकोट गुजरात) याला अटक करण्यात आली आहे. सदर गाडय़ा कुठे भरल्या होत्या व कुठे जात होत्या याबाबत अद्याप काहीच समजलेले नाही. तसेच दुसऱया वाहनाच्या चालकाचा अजून शोध लागला नसून त्याचा तपास सुरू आहे. अशी माहिती निरिक्षक हसन खान यांनी दिली. याप्रकरणी डिचोलीचे अबकारी निरिक्षक हसन खान यांच्या मार्गदर्शनाखाली अबकखरी उपनिरीक्षक गजानन गावस, हवालदार वासुदेव गावस, सहाय्यक हवालदार प्रसाद गाड, रामकृष्ण मांदेकर, गोकुळदास गावडे व इतरांनी मोलाची कामगिरी बजावली.
सध्या राज्यात लॉकडाउनमुळे मद्याच्या बाबतीत केवळ घाऊक विपेत्यांचीच दुकाने सुरू आहेत. सध्या आंतरराज्य सीमा केवळ जिवनावश्यक वस्तुं®³ाा वाहतुकीहाठीच खुली असताना राज्यातून बाहेर बेकायदेशीर रित्या दारूची वाहतूक होणे म्हणजे मोठय़ा आश्चर्याची बाब आहे. यावरून या राज्यातून कोणत्याही प्रकारच्या बेकायदा गोष्टीची वाहतूक सीमेवरील चेकनाक्मयांवरून चालू असल्याचे दिसून येते. दोडामार्ग येथे जप्त करण्यात आलेल्या गाडय़ांमधील मालाची तपासणी करताना एक चालक पळाल्याने सदर दोन्ही वाहनांची सखोल तपासणी करण्याचे अबकारी अधिकाऱयांना सुचल्याने हे बेकायदा दारूच्या वाहतूकीचे प्रकरण उघडकीस आले. म्हणजेच इतर वस्तू व मालाच्या आड या राज्यातून अनेक बेकायदेशीर गोष्टींची इतर राज्यात वाहतूक झाली असल्याचे आणि गोवा राज्यातही बऱयाच बेकायदेशीर गोष्टी आल्याचाही दाट संशय येतो.