मोंडपार ग्रामपंचायतीतील रिक्त डाटा ऑपरेटरचा मुद्दा गणेश राणेंकडून उपस्थित
प्रतिनिधी / ओरोस:
‘डाटा ऑपरेटर’साठी मोंडपार ग्रामपंचायतीकडून सुमारे पावणेतीन लाखाचा निधी जमा करून घेऊनही मागील तीन वर्षे डाटा ऑपरेटर न देण्याच्या ग्रामपंचायत विभागाच्या कार्यपद्धतीबाबत गणेश राणे यांनी नाराजी व्यक्त केली. ग्रामपंचायतीला विकासापासून वंचित ठेवले गेल्याचा आरोपही त्यांनी केला.
जि. प. वित्त समितीची सभा गुरुवारी बॅ. नाथ पै सभागृहात वित्त सभापती रवींद्र जठार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सभा सचिव तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी गौतम जगदाळे, सदस्य महेंद्र चव्हाण, गणेश राणे, जेरॉन फर्नांडिस, नागेंद्र परब यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
आगावू रक्कम घेऊनही सुविधा नाहीत
डाटा ऑपरेटरची सेवा पुरविण्यासाठी म्हणून ग्रामपंचायत विभागाने ग्रामपंचायतींकडून आगाऊ रक्कम भरून घेतली आहे. काही ग्रामपंचायतींना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. मात्र काहींचे पैसे घेऊनही ती देण्यात आलेली नाही. देवगड तालुक्यातील मोंडपार ग्रामपंचायतीकडून तीन वर्षांपूर्वे 2 लाख 78 हजार 544 रुपये जमा करून घेतले गेले आहेत. मात्र या कालावधीत डाटा ऑपरेटर देण्यात आलेला नाही. शिवाय पुन्हा रक्कम जमा करण्याची सूचना करण्यात आली आहे, असा मुद्दा गणेश राणे यांनी मांडून या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्याक्त केली. ग्रामपंचायतीचा निधी अडकवून ठेवून विकासकामांना खो घातल्याचा आरोपही त्यांनी केला. सभापती जठार यांनी या रकमेचे संबंधित ग्रामपंचायतीला व्याज दिले जाणार का? असाही सवाल उपस्थित करीत संबंधित विभागाच्या अधिकाऱयांना निरुत्तर केले.
अणाव पालववाडी रस्ता गेला वाहून
जिल्हा परिषदेने यावषी केलेला कुडाळ तालुक्मयातील अणाव पालववाडी येथील रस्ता पावसात पूर्णपणे वाहून गेल्याचा आरोप विरोधी पक्षाचे गटनेते नागेंद्र परब यांनी यावेळी केला. मात्र त्यांचा आरोप फेटाळत कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांनी मी त्या रस्त्याने नेहमी येते. मला रस्ता वाहून गेल्याचे दिसले नाही, असे स्पष्ट करीत तो सुस्थितीत असल्याचा दावा केला.
रस्त्यांच्या दुरुस्तीचे काय?
दरम्यान सदस्य गणेश राणे यांनीही देवगड-मोंडपार हा 2018-19 मध्ये केलेला रस्ता वाहून गेल्याचे सांगितले. तसेच गणेशोत्सव जवळ आला आहे. त्यामुळे पावसाने नुकसान झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावेळी कार्यकारी अभियंता सौ जाधव यांनी सुरुवातीच्या पावसात वाहून गेलेल्या रस्त्यांची यादी तयार करून ती जिल्हाधिकाऱयांकडे पाठविली आहे. अलिकडच्या पावसात वाहून गेलेल्या रस्त्यांची यादी मागविली आहे. ती प्राप्त होताच जिल्हाधिकाऱयांना सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले.
कमी बजेटमुळे नियोजन
कोरोनामुळे यावषी जिल्हा परिषदेचे बजेट कमी होणार आहे. त्यामुळे याचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी मागच्या सभेत प्रत्येक विभागाने आपल्या विभागाचे दायित्व किती आहे? हे कळविण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे प्रत्येक विभागाने याची माहिती दिली. त्याचे सभागृहात वाचन झाले. पण एकूण दायित्व किती आहे, ही माहिती वित्त विभागाकडून सभागृहात देण्यात आली नाही.