चंदीगढ : देशात पहिल्या ‘ग्रेन एटीएम’ची सुरुवात करण्यात आली आहे. सदरची योजना ही गुरुग्राम येथून पायलट प्रकल्पाच्या स्वरूपात सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये मशीनवर एकाचवेळी पाच ते सात मिनिटात 70 किलोपर्यंत अन्नधान्य काढता येणार आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी याबाबत माहिती दिली आहे.
आता ग्राहकांना अन्नधान्य घेण्यासाठी सरकारी रेशन दुकानात भली मोठी रांग लावण्याची गरज लागणार नाही. कारण येथील ग्राहकांना हरियाणा सरकारने ‘अन्नधान्य एटीएम’ची सुरुवात केली आहे.
वितरण विभागात पारदर्शकता
यायोगे सार्वजनिक पातळीवर खाद्य वितरण प्रणालीत अधिकची पारदर्शकता आणली जाणार आहे.