धामोड /प्रतिनिधी
धामोड ( ता. राधानगरी ) येथे सोमवारी कोरोना बाधित व्यक्ती सापडली होती. त्यामुळे धामोड परीसरात भितीचे वातावरण पसरले होते. त्याच्या संपर्कात आलेल्या २९ लोकांना राधानगरी इथल्या कोविड केंद्रात दाखल केले होते. या सर्वांचे स्वॅब सोमवारी घेतले होते. मंगळवारी आलेल्या कोरोना चाचणीमध्ये त्यांच्यावर आठ -दहा दिवसापूर्वी निमोनिया आजारावर उपचार करणारे भोगावती येथील डॉक्टर , नर्स, त्यांचा कर्मचारी स्टाफ यांच्यासह गावातील संपर्कात आलेल्या २९ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यामुळे धामोडवासियांनी सुटकेचा निश्वास सोडला. या सर्व २९ लोकांना खबरदारी म्हणून होम क्वारंटाईन होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बाधित व्यक्ती शेतकरी असून कुठेही फिरलेली नाही. त्यामुळे कोरोना संपर्क कसा झाला ? याबाबत संभ्रमावस्था आहे.
दरम्यान धामोड ग्रामपंचायतीने पाच दिवसांचा लॉकडाऊन पाळत गावातून सॅनिटायझरची फवारणी केली आहे. शिवाय ग्रामस्थांना खबरदारीच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.