जिल्हाधिकाऱयांनी बैठक घेऊन केल्या सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
प्रजासत्ताक दिन साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. सरकारी नियमांचे पालन करत प्रजासत्ताक दिन साजरा करायचा असून सरकारी अधिकारी व कर्मचाऱयांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, अशी सूचना जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा करण्याबाबत चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात आली. बैठकीत जिल्हाधिकाऱयांनी ही सूचना केली आहे. जिल्हा क्रीडांगणावर प्रजासत्ताक दिन होणार आहे. सरकारी कार्यालये, मंदिरे, प्रार्थनास्थळे यांच्यावर विद्युत रोषणाई करावी, असेही जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.
शाळा व महाविद्यालयांसमोर केवळ ध्वजारोहण होणार आहे. 26 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते 8.30 या वेळेत ध्वजारोहण करून शिक्षक व प्राध्यापकांनी जिल्हा क्रीडांगणावर उपस्थित रहावे, राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी, असेही यावेळी सांगण्यात आले. प्रजासत्ताक दिनी काढण्यात येणाऱया फेरीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची फेरी काढू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
कोरोनाचे सर्व नियम पाळत प्रजासत्ताक दिन साजरा करायचा आहे. अधिकाऱयांनी जिल्हा क्रीडांगणावर सर्व ती तयारी करावी. प्रत्येकाचे थर्मल स्क्रिनिंग करूनच आत प्रवेश द्यावा, असेही सांगण्यात आले. या बैठकीला महापालिका आयुक्त जगदीश के. एच., प्रांताधिकारी अशोक तेली यांच्यासह पोलीस अधिकारी आणि इतर अधिकारी उपस्थित होते.