प्रतिनिधी / वाकरे
गेली कित्येक वर्ष रखडलेली प्राध्यापक भरती सुरू करावी अशी मागणी नेट सेट पीएचडी संघर्ष समितीच्यावतीने पुणे शिक्षक मतदारसंघाचे आमदार प्रा.जयंत आसगावकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली.
आमदार आसगावकर यांना दिलेल्या निवेदनात नेट-सेट पीएचडी धारक संघर्ष समितीच्यावतीने १०० टक्के प्राध्यापक भरती करावी, समान काम समान वेतन मिळावे,२०० बिंदू नामावली लागू करावी,थकित सीएचबी मानधन मिळावे, या मागण्या करण्यात आल्या. यावेळी चर्चा करताना आमदार आसगावकर यांनी प्राध्यापक भरतीबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी प्राध्यापक भरती विषयी चर्चा झालेली आहे, त्यांनी लवकरच रखडलेली प्राध्यापक भरती सुरू करण्याचे आश्वासन दिल्याचे ते म्हणाले.
यावेळी संघटनेचे प्रा.डॉ.उज्वला बिरजे,प्रा. राहुल भास्कर, प्रा. संदीप हरगाने ,प्रा. प्रशांत देशमुख , प्रा. चौगुले, प्रा.सचिन कामत, प्रा. प्रकाश पाटील, प्रा.सौरभ पाटणकर, प्रा.एफ.एनपटेल ,प्रा.अजय कांबळे, प्रा. चारुशीला तासगवे उपस्थित होते.