वार्ताहर / शिये
भुये – भुयेवाडी परिसरात सुमारे ११ गव्याचा कळप मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास दिसला आहे. हा कळप भैरोबा मंदिरा पाठीमागील तळ्याजवळ काही मेंढपाळ व शेतकऱ्यांच्या निदर्शनास आला आहे.
दरम्यान बुधवारी सकाळी या परिसरात वनरक्षक एस.एस. हजारे व कृष्णात दळवी यांनी पहाणी केली असून हा गव्याचा कळप डोंगरातील जंगलांतुन सादळे – मादळेकडे गेला असल्याचे सांगितले. तरी भुये, भुयेवाडी, सादळे – मादळे परिसरातील नागरिकांनी शेताकडे जाताना काळजी घ्यावी असे आवाहन वनविभागाच्यावतीने करण्यात आले आहे.