क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
मये युनियन स्पोर्ट्स क्लबने आयोजित केलेल्या टी-20 लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत ब्राम्हणी स्पोर्ट्स क्लब आणि आमोणेच्या साईबाबा स्पोर्ट्स क्लबने प्रतिस्पर्धी संघावर विजय नोंदविले. मये मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या लढतीत ब्राम्हणी स्पोर्ट्स क्लबने अमरावती स्पोर्ट्स क्लबचा 31 धावानी पराभव केला. दुसऱया सामन्यात आमोणेच्या साईबाबा स्पोर्ट्स क्लबने युनियन माशेल स्पोर्ट्स क्लबचा 6 विकेट्सनी पराभव केला.
संक्षिप्त धावफलकः नागेशी यूथ, 18 षटकात 5 बाद 185 (मयुर तिळवे 84, सचिन कुर्पास्कर 42, केदार नाईक 17, शुभम गावडे 14 धावा. साईनाथ गावकर 3-22) विजयी विरूद्ध ब्राम्हणी स्पोर्ट्स क्लब, 18 षटकात सर्वबाद 128 (विजय गावकर 24, महेंद्र गावकर 21, सुनील गावकर 17, नितीन केरकर 14 धावा. सचिन कुर्पास्कर 3-19, उदेश रामनाथकर 3-24, बाबूलाल पठाण व निश्चय नाईक प्रत्येकी एक बळी). सामनावीर- मयुर तिळवे (नागेशी यूथ).
नावेली स्पोर्ट्स क्लब, 20 षटकात 8 बाद 213 (समर्थ गावस 111, अविनाश गावस 66 धावा. विनय आमोणकर 4-26, सुनील सिनारी 2-17, तुकारम गावस 1 बळी) विजयी विरूद्ध साईबाबा स्पोर्ट्स क्लब, 15 षटकात सर्वबाद 112 (किशोर सिनारी 22, विनय आमोणकर 20, संजू गावस 12 धावा. पंकज नाईक 3-15, दिपराज गावस 2-12, प्रतीक गावस 2-19). सामनावीर- समर्थ गावस (नावेली स्पोर्ट्स क्लब).