बंद पडलेले सिटी स्कॅन मशिन देऊन फसवणूक, एकावर गुन्हा
प्रतिनिधी/मिरज
शहरातील गुलाबराव पाटील मेडीकल कॉलेजजवळ राहणाऱ्या संतोष चंदू कुलगोड या डॉक्टराच्या बेळगांव येथील हॉस्पिटलमध्ये स्लाईड सिटी स्कॅन मशिन बसवून देण्याचे अमिष दाखवून तब्बल 50 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. 50 लाखांच्या बदल्यात बंद पडलेले सिटी स्कॅन मशिन दिल्याची तक्रार सदर डॉक्टराने महात्मा गांधी चौकी पोलिसात दिली आहे. त्यानुसार चंद्रकांत कुमार शिंगाडे (वय 35, रा. सी-35 स्वप्नशिल्प फेज 2, ओआयसीस सिटीजवळ, नऱ्हे, जिल्हा. पुणे, मुळगांव, म्हैसाळ ता. मिरज) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, गुलाबराव पाटील मेडीकल कॉलेजजवळ आदिलक्ष्मी अर्पाटमेंटमध्ये डॉ. संतोष कुलगोड हे राहण्यास आहेत. बेळगांव येथे आदित्य डायग्नॉस्टीक सेंटर नावाने त्यांचे हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये 56 लाख रुपये खर्चाच्या 16 स्लाईड सिटी स्कॅन मशिन देतो म्हणून चंद्रकांत कुमार शिंगाडे याच्याशी व्यवहार झाला होता.
त्यानुसार डॉ. कुलगोड यांनी व्हीजन हेल्थकेअर सर्व्हीसेस या कंपनीच्या बँक खात्यावर आरटीजीएसद्वारे 50 लाख रुपये वेळोवेळी पाठविले. त्याबदल्यात संबंधीत कंपनीने 16 स्लाईड सिटी स्कॅन मशिन दिले. मात्र, सदरच्या सर्व बंद असलेल्या मशिनी दिल्या.