ऑनलाईन टिम : लुधियाना
पंजाबच्या लुधियाणा येथील सत्र न्यायालयाच्या परिसरात गुरुवारी स्फोट झाला. या भयंकर स्फोटात सत्र न्यायालयाच्या परिसरातील एक भिंत कोसळली. त्याच्याच ढिगाराखाली दबून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या कोर्ट क्रमांक 9 जवळ हा स्फोट घडला. सुत्रानुसार स्फोट गॅस सिलिंडरचा असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.