वाकरे/प्रतिनिधी
सांगरूळ फाटा ,कोपार्डे (ता. करवीर) येथे गेले महिनाभर दोन बेवारस दुचाकी पडून असून करवीर पोलिसांनी त्याचा शोध घ्यावा अशी मागणी होत आहे.
करवीर तालुक्यातील सांगरूळ फाटा,कोपार्डे हा चौक व्यवसाय केंद्र असून याठिकाणी रात्रंदिवस वाहनांची ये-जा सुरू असते. दिवसभर या परिसरात व्यवसायाच्या निमित्ताने शेकडो लोकांची ये जा सुरू असते.या परिसरातील चौकात एक भव्य व्यापारी संकुल आहे.या संकुलासमोर गेले महिनाभर एक मोटारसायकल (क्रमांक एम.एच.१२ डी एफ ८२१७) पडून आहे, तर स.ब. खाडे महाविद्यालय परिसरातील पार्किंग शेडमध्ये एक स्पिरिट स्कूटर( क्रमांक एम.एच.०९ जे ३९१९) गेला महिनाभर पडून आहे. या बेवारस वाहनांची चोरी झाली असण्याची शक्यता असून पेट्रोल संपल्याने त्या याठिकाणी सोडल्या असल्याची शक्यता आहे.या दोन दुचाकीच्या मालकांचा करवीर पोलिसांनी शोध घ्यावा अशी मागणी होत आहे.