तरुण भारत संवाद प्रतिनिधी /सोलापूर
सोलापूर ग्रामीण पोलिसांनी तावडेश्वर टोल नाक्यावर तीन कोटींचे सोने पकडले आहे. सोलापूर पुणे महामार्गावरुन एका गाडीतून सोने नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार काल रात्रीपासून ह्या महामार्गावर पोलीस तपासणी करत असताना त्यांनी तावडेश्वर टोल नाक्यावर तीन कोटींचे सोने पकडले आहे. विशाखापट्टणमवरून गाडी घेऊन मुंबईला सोन्याची तस्करी होणार होती. तर ह्या गाडीत सापडलेल्या सहा किलो सोन्यासह दोन आरोपींना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.