एकतर्फी प्रेमाचा दुमकामध्ये आणखी एक बळी
वृत्तसंस्था / दुमका
झारखंडमधील अंकिताच्या हत्येचे प्रकरण अद्याप चर्चेत असताना दुमकामध्ये अशाच प्रकारची आणखी एक घटना घडली आहे. एकतर्फी प्रेमातून एका विवाहित पुरुषाने अत्यंत निर्दयीपणे एका युवतीवर पेट्रोल ओतून तिला जाळले आहे. या युवतीचा मृत्यू झाला आहे. दुमका येथील भरतपूर टोला गावात ही घटना घडली आहे.
रात्रीच्या वेळी लोक झोपलेले असताना राजेश राऊत या आरोपीने मुलीच्या घरी जात तिच्यावर पेट्रोल ओतले. काही कळण्यापूर्वीच राजेशने तिला आगीच्या हवाली केले होते. आरडाओरड ऐकून तेथे पोहोचलेल्या ग्रामस्थांनी आग विझविली आणि तिला रुग्णालयात हलविले. रुग्णालयात उपचार सुरू असताना युवतीचा मृत्यू झाला आहे.
विवाहित असणाऱया राजेश राऊतने युवतीला विवाहाबद्दल विचारणा केली होती. युवतीने त्याला स्पष्ट नकार दिला होता. याचमुळे संतापलेल्या राजेशने तिला जिवंत जाळले आहे.