अमेझॉन प्राइम व्हिडिओकडून ट्रेलर सादर
अमेझॉन प्राइम व्हिडिओने स्वतःची बहुप्रतीक्षित रियल क्राइम डॉक्यू-सीरियज ड़ान्सिंग ऑन द ग्रेव्ह’चा ट्रेलर जारी केला आहे. हायप्रोफाइल अन् धनाढय़ शकीरा खलीलीच्या हत्येवर आधारित याच्या कहाणीचा ट्रेलर अंगावर काटे आणणारा आहे. या सीरिजमध्ये शकीरा खलीली बेपत्ता होण्याची आणि रहस्यमय हत्येच्या चौकशीची पूर्ण कहाणी दर्शविण्यात येणार आहे. 30 वर्षांपूर्वी शकीरा खलीलीच्या क्रूर हत्येने पूर्ण देशाला हादरवून सोडले होते. या घटनेची पूर्ण कहाणी दाखविण्याची जबाबदारी प्राइम व्हिडिओने घेतली आहे. शकीरा खलीलीची हत्या 90 च्या दशकात बेंगळूर येथे झाली होती. या सीरिजची कहाणी पॅट्रिक ग्रॅहम यांनी लिहिली असून त्यांनीच याचे दिग्दर्शन केले आहे. ही सीरिज 21 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका प्रतिष्ठित कुटुंबाची सदस्य आणि सुंदर महिलेच्या हत्येची ही कहडणी आहे. या महिलेला 4 मुली होत्या, परंतु दुसरा विवाह करण्यासाठी शकीराने सर्वकाही सोडून दिले होते. शकीराने हा निर्णय कशामुळे घेतला? स्वतःचे कुटुंब सोडण्यासाठी तिला कुणी प्रेरित केले याची उत्तरे डान्सिंग ऑन द ग्रेव्ह या सीरिजमधून मिळणार आहेत.