पुणे : आयुष्यात फिटनेसला फार महत्त्वाचे स्थान आहे. काम करणे, खाणे आणि झोपणे या गोष्टींना ज्याप्रमाणे काही पर्याय नसतो, त्याचप्रमाणे चांगले आरोग्य राखणे व व्यायाम करणे या गोष्टींनाही पर्याय नाही, असा सल्ला अभिनेत्री तन्वी मल्हाराने दिला.
‘फिटर’ या भारतातील आरोग्य व फिटनेसविषयक प्लॅटफॉर्म बनविणाऱ्या कंपनीने अभिनेत्री तन्वी मल्हाराची ब्रँड ऍम्बेसिडर’ म्हणून नियुक्ती केली. यानिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमात बोलताना तन्वी म्हणाली, चांगले आरोग्य राखण्यासाठी व्यायाम करणे हा दैनंदिन जीवनशैलीचा भाग आहे. मी गेल्या काही काळापासून फिटर या प्लॅटफॉर्मशी निगडीत आहे. गेल्या वषी अनेक भारतीय शहरांमध्ये ‘फिटर स्ट्रीट’ मोहीम आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये मी संयोजकाची भूमिका केली होती. या मोहिमेतून लोकांना दररोज व्यायाम करण्यास प्रवृत्त करण्यास आम्ही अतुलनीय यश मिळविले. भारतीयांना अधिक तंदुरुस्त व सक्रिय जीवनशैलीसाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मी फिटरच्या टीमचा एक भाग झाले, याचा आनंद आहे.
सातशेहून अधिक तज्ञ प्रशिक्षकांच्या सहाय्याने सानुकूलित आहार आणि व्यायाम यांच्या योजना सादर करून प्रत्येक माणसाला फिट बनविण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. विज्ञानाधारीत पद्धती अवलंबणे, तसेच लोकांना तंदुरुस्त शरीर आणि निरोगी व आनंदी मन प्राप्त करण्यात मदत करणे हे आमच्या प्लॅटफॉर्मचे वेगळेपण आहे, असेही ती म्हणाली.