Haldikunku ceremony on January 25 by Shiv Sena
हिन्दुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सावंतवाडी विधानसभा संपर्क प्रमुख श्री शैलेश परब यांच्या सहकार्यातून 25 जानेवारीला शिवसेना सावंतवाडी शहर व तालुका महिला आघाडी तर्फे मकर संक्रांती निमित्त हळदीकुंकू व तिळगुळ समारंभाचे आयोजन केले आहे. या प्रसंगी सर्व महिला भगिनींनी सायंकाळी चार ते रात्र सात वाजेपर्यंत या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना महिला आघाडीच्या वतीने तालुका संघटक रश्मी माळवदे व शहर संघटक श्रुतिका दळवी यांनी केले आहे.
सावंतवाडी / प्रतिनिधी