सांगली : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महनगरपालिकेकडून माता सुरक्षित तर सुरक्षित या अभियानांतर्गत आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी 100 महिलांची रक्त तपासणी, रक्तदाब , मधुमेह तपासणी करण्यात आली. महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन महापालिकेच्या सभागृह नेत्या भारती दिगडे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी स्थानिक नगरसेविका अनारकली कुरणे, सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण, महापालिका आरोग्य केंद्र क्रमांक 7 चे मेडिकल ऑफिसर डॉ. विनोद मडावी, टिबी सुपरवायझर विराज भालकर, आरोग्य सेविका प्रियांका पाटील, आशा वर्कर शिलवंती यांच्यासह महालॅबचे प्रतिनिधी उपस्थित होते. या विशेष शिबिरात सुंदरनगर मधील वारांगना महिलांची रक्त चाचणी, रक्तदाब, मधुमेह तपासणी यावेळी करण्यात आली. यावेळी अनेक महिलांना उच्च रक्तदाब असल्याचे आढळून आले. या शिबिराचे संयोजन सादिक शेख यांनी केले.