सातारा प्रतिनिधी
सातारा तालुक्यात आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसाचा जोर शुक्रवारपासून ओसरल्याचे पहावयास मिळाले. हवामान विभागाकडून सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. १, २ आणि ३ ऑगस्ट हे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात गेले दोन दिवस पाऊस मध्यम स्वरूपात आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात २२ मिमी पावसाची नोंद आहे, तर महाबळेश्वर भागात ३१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
तसेच असले तरी सद्यस्थितीत भात लावणीसह भुईमूग, सोयाबीनसह अन्य पिकांची टोकणीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. सातारा जिल्हाला पुन्हा ऑरेंज अलर्ट असल्यामुळे जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.