कुंकळ्ळी : केगदीकटा, कुंकळळी येथील श्री माँ दुर्गा देवस्थानात 15 पासून नवरात्रोत्सव साजरा करण्यास प्रारंभ झाला असून असून यावेळी दांडिया, गरबा आदी नृत्ये तसेच धार्मिक आणि मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत. येथील नवरात्रोत्सवाचे हे दहावे वर्ष आहे. या उत्सवात परराज्यांतील भाविकही मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन मनसोक्त आनंद लुटत असतात. रविवार दि. 15 रोजी सकाळी 11 वा. धार्मिक विधी, श्री दुर्गादेवीची विधिवत स्थापना, अभिषेक, इतर धार्मिक विधी, आरती, तीर्थप्रसाद, रात्री 9 वा. दांडिया-गरबा कार्यक्रम झाला. आज सोमवार दि. 16 रोजी सकाळी 11 वा. धार्मिक विधी, देवीपूजा, रात्री आरती, 9 वा. दांडिया-गरबा, मंगळवार दि. 17 रोजी सकाळी धार्मिक विधी, देवीपूजा, मध्यान्ह आरती, रात्री 9 वा. आरती, प्रसाद, नंतर दांडिया-गरबा होईल.
याचप्रमाणे बुधवार दि. 18 ते रविवार दि. 22 पर्यंत रोज सकाळी नित्य धार्मिक विधी, पूजा, आरती, प्रसाद, तर रात्री 9 वा. आरती, प्रसाद, नंतर दांडिया-गरबा असे कार्यक्रम होतील. सोमवार दि. 23 रोजी सकाळी नित्य धार्मिक विधी, 9 वा. महानवमी उत्सव, देवीस अभिषेक, इतर धार्मिक विधी, दुपारी 1 वा. महाआरती, महाप्रसाद, नंतर सायंकाळी 4 वा. श्री माँ दुर्गादेवीची पालखी मिरवणूक, 7 वा. सुहासिनींसाठी आरती, तर रात्री 9 वा. आरती, प्रसाद होईल. मंगळवार दि. 24 रोजी सकाळी दुर्गापूजन, मध्यान्ह आरती झाल्यानंतर रात्री 9 वा. श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची विसर्जन मिरवणूक निघेल. तरी समस्त भक्तांनी नवरात्रोत्सवात आवर्जुन सहभागी होऊन देवीच्या कृपेस पात्र व्हावे, असे आवाहन उत्सव समितीतर्फे करण्यात आलेले आहे. उत्सव सर्वार्थाने यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीचे प्रमुख संजय नाईक, सनरूप नाईक, सुजित नाईक, अक्षय नाईक, रोहित झा, सरिता नाईक, संयुक्ता देसाई, सलिता शिरवंत, माधुरी नाईक यांच्याकडून परिश्रम घेतले जात आहेत.