बोगमाळो येथेअ मरनाईकखून प्रकरण
प्रतिनिधी /मडगाव
अमर नाईक या 30 वर्षीय युवकाच्या दिवसा उजेडा केलेल्या खूनप्रकरणासंबंधी 7 जून रोजी या प्रकरणासंबंधी तिन्ही संशयित आरोपींना 7 जून रोजी न्यायालयात हजर करण्याचे निर्देश मडगावच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने कोलवाळ तुरुंगाच्या जेलरना दिले.
या पूर्वी झालेल्या सुनावणीच्यावेळी या तिन्ही संशयित आरोपीविरुद्ध 27 मे रोजी अतिरिक्त सत्र न्यायालयात आरोप निश्चित करण्यात येणार होते. मात्र, शुक्रवारी या तिन्ही संशयितांना प्रत्यक्ष हजर न केलयाचे पाहून न्यायालयाने जेलरना वरील निर्देश दिले.
हा खटला न्यायालयात चालू असताना तिसऱया क्रमांकाचा संशयित आरोपी रवीशंकर यादव याने आपल्याला जामिनावर सोडण्यात यावे अशी न्यायालयाकडे विनंती करणारा अर्ज केला होता. हा अर्ज अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावला होता.
न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रानुसार 15 जुलै 2021 खुनाची ही घटना घडली होती. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील शैलेश गुप्ता, शिवम सिंग, रवीशंकर यादव अशी संशयितांची नावे आहेत.
कट रचून खून केल्याचा आरोप वरील सर्व संशयितावर आहे. शिवाय एकावर प्राणघातक हल्ला केल्याचाही आरोप आहे. भारतीय दंड संहितेच्या 307, 302, 120 – ब तसेच शस्त्रास्त्र कायद्याच्या 25 व्या कलमाखाली या प्रकरणातील संशयिताविरुद्ध वास्को पोलिसांनी गुन्हा नोंद केलेला आहे.