प्रतिनिधी /बेळगाव
सर्व लोकसेवा फौंडेशन बेळगावच्यावतीने नंदिहळ्ळी येथे रोपांची लागवड करण्यात आली. गावातील माजी तालुका पंचायत समिती व सामाजिक कार्यकर्ते मारुती लोकूर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व लोकसेवा फौंडेशनचे अध्यक्ष विरेश हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली नंदिहळ्ळी येथील वाकडे वड येथील देवीच्या परिसरात आपटय़ाचे रोप लावण्यात आले.
महादेवी बसय्या हिरेमठ यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम झाला. तसेच गावातील हनुमान मंदिर व बिरदेव मंदिर परिसरातदेखील बेलपत्र व आपटय़ाच्या रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी लिंगय्या बुरलकट्टी, परशुराम कुरबर, सिद्राई कुरबर, रमेश राऊत, मल्लिकार्जुन लोकूर, परशुराम बाचोळकर, महेश कुरबर, गणेश कुरबर, मंदिराचे पुजारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.