बेळगाव : ‘तरुण भारत’ परिवारातर्फे हिंडलगा येथील कार्यालयामध्ये 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ‘तरुण भारत’ सोशल मीडिया विभागाचे विभाग प्रमुख तौसिफ मुजावर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत होऊन ध्वजाला सलामी देण्यात आली.
यावेळी ‘तरुण भारत’ कार्यालयाच्या सुरक्षा दलाच्यावतीने आकर्षक पथसंचलन पार पडले. तरुण भारतच्या कार्यकारी संचालक रोमा ठाकुर, व्यवस्थापक गिरीधर रवीशंकर, सीएमओ उदय खाडीलकर यांच्या उपस्थितीत संपादक जयवंत मंत्री यांच्या हस्ते तौसिफ मुजावर यांचा सत्कार करण्यात आला. सीएमओ उदय खाडीलकर यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी ‘तरुण भारत’ कार्यालयातील विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.