मुंबई
तीन आठवडय़ाच्या कालावधीनंतर अखेर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर खाली आलेले पाहायला मिळाले असून याचा परिणाम या क्षेत्रातील विविध कंपन्यांच्या समभागांच्या घसरणीत दिसून आला आहे. तेलाच्या किमतीत 6 टक्के घसरण झाली असून दर 113 डॉलर प्रति बॅरेलवर आले आहेत. व्याजदर वाढीने गुंतवणूकदार चिंतीत आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता असून ऊर्जा मागणी घटण्याची भीतीही दुसरीकडे व्यक्त केली जात आहे. तेल क्षेत्रातील ओएनजीसी, अदानी टोटल गॅस हिंदुस्थान ऑईल यांचे समभाग घसरणीत होते.