वृत्तसंस्था/ चेन्नई
मध्यफळीत खेळणारा फुटबॉलपटू आयुष अधिकारीने 2023-24 च्या इंडियन सुपरलिग फुटबॉल हंगामासाठी चेन्नियन एफसी संघाबरोबर करार केला आहे. सदर माहिती चेन्नियन एफसीच्या प्रवक्त्याने रविवारी दिली.
यापूर्वी आयुष अधिकारी केरळा ब्लास्टर्स एफसी संघाचे प्रतिनिधीत्व करीत होता. चेन्नियन एफसी संघाने अलीकडच्या कालावधीत 11 फुटबॉलपटूंशी नवा करार केला आहे. वयाच्या 18 व्या वर्षी आयुष अधिकारीने व्यावसायिक फुटबॉल क्षेत्रात आपले पदार्पण केले होते. त्याने इंडियन सुपरलिग फुटबॉल स्पर्धेत 30 सामन्यात केरळ ब्लास्टर्सचे प्रतिनिधीत्व केले आहे.