प्रयाग चिखली वार्ताहर
करवीर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या वडणगे मतदार संघातील वडणगे आंबेवाडी प्रयाग चिखली वरणगे पाडळी या पाच गावांतील ग्रामपंचायतीसाठी आज अत्यंत चुरशीने मतदान झाले. पाच गावापैकी एक दोन गावातील किरकोळ बाचाबाची वगळता मतदान शांततेत पार पडले. सर्वच गावात स्थानिक आघाड्यांमध्ये अत्यंत अटीतटीच्या दुरंगी लढती झाल्याचे चित्र होते.
सेवा रुग्णालयातून थेट मतदान केंद्रावर …
आंबेवाडी येथील कृष्णात ज्ञानू बोरगे या तरुणाचे बावडा सेवा रुग्णालय येथे अपेंडिक्स ऑपरेशन केले आहे मतदानासाठी या तरुणाने ॲम्बुलन्स मधून थेट आंबेवाडी येथे येऊन मतदानाचा हक्क बजावला.
वडणगे येथील एकूण १०७६१ पैकी,९१७४ इतके (८५ टक्के) मतदान झाले
आंबेवाडी येथील एकूण १४९६ पैकी १४५९ इतके (८६ टक्के) मतदान झाले
प्रयाग चिखली येथील ४८७० पैकी ४२८८ इतके(८८ टक्के) मतदान झाले
वरणगे येथील ३३९५ पैकी २९५८ इतके (८७ टक्के) मतदान झाले
पाडळी बुद्रुक येथील १८८८ पैकी १६७९ इतके (८९ टक्के )मतदान झाले
दरम्यान सर्वच गावातिल कार्यकर्त्यांकडून मतदानानंतर दिवसभराच्या घडामोडी आणि अंदाजाचे आकडेवारीवर चर्चा रात्री उशिरापर्यंत चालू होती