वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जपानची वाहन निर्मिती कंपनी टोयोटा आणि मारुती सुझुकी यांनी भारतात विकास आणि उत्पादन क्षेत्राला सहकार्य व चालना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. यामध्ये दोन्ही कंपन्यांनी संयुक्तपणे दिलेल्या माहितीनुसार विकसित नवीन एसयूव्हीचे उत्पादन चालू वर्षात ऑगस्ट महिन्यात टोयोटा किर्लोस्कर मोटार येथे सुरु करणार आहे.
भारतामधील मारुती सुझकी आणि टीकेएम भारतात या नवीन मॉडेल्सना बाजारात आणणार असून यामध्ये दोन्ही कंपन्या स्वतंत्रपणे मॉडेल्स दाखल करणार आहेत. यासह दोन्ही कंपन्या नवीन मॉडेल भारताच्या बाहेरील बाजारात निर्यात करण्याचीही योजना तयार करत आहेत. यामध्ये आफ्रिकेच्या बाजाराचाही समावेश होतो.
वृद्धीमध्ये योगदान मिळेल
टीकेएममध्ये नवीन एसयूव्ही गटातील मोटारांची भारतामधील विक्री वाढविण्यावर भर देणार असल्याचा विश्वास सुझुकीचे अध्यक्ष तोशिहिरो सुझुकी यांनी व्यक्त केला आहे.
दुसऱया बाजूला आम्ही सुझुकीसोबत नवीन एसयूव्हीची घोषणा करणार असल्याचे टोयोटाचे अध्यक्ष अकियो तोयोदा यांनी स्पष्ट केले आहे.