केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली
लॉजिस्टिक क्षेत्रामध्ये होणाऱया मालांची उलाढाल पाहता त्यामधील पारदर्शकता अधिक वाढवण्याची गरज आहे. येणाऱया कालावधीत पारदर्शकता येण्यासाठी विशेष लक्ष्य करण्याची गरज असल्याचे केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी यावेळी म्हटले आहे.
मागील काही दिवसांपासून करण्यात आलेल्या निरीक्षणावरुन या क्षेत्रात म्हणावी तशी पारदर्शकता आलेली नसून मी याबाबत पूर्णपणे संतुष्ट नाही. या सर्व बाबतीत सुधारणांची गरज असल्याचे गोयल यांनी स्पष्ट केले आहे.
खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करावा
उद्योग आणि सरकारला लॉजिस्टिकमध्ये येणारा खर्च कमी करण्यासाठी एकत्रितणे काम करण्याची गरज आहे. यामध्ये जीडीपी 13 ते 14 टक्के आहे, हा विकासदर विकसित देशांमध्ये 7 ते 8 टक्के असल्याचेही गोयल यांनी नमूद केले आहे.