रायगड प्रतिनिधी
मुंबई- गोवा महामार्गावर पेणकडून पनवेलकडे येणाऱ्या रिक्षेला पळस्पे गावाजवळ जेडब्ल्यूसी कंपनी समोर ट्रेलरने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात रिक्षामधील महिला प्रवासी आणि रिक्षाचालक यांचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी ट्रेलर चालका विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेण (जिल्हा रायगड) जिते येथील रहिवाशी प्रभावती चांगा पाटील (जिते, पेण) या रिक्षामधून आज सकाळी पेणकडून पनवेलकडे पळस्पे जात असताना जेडब्ल्यूसी कंपनी समोर आले. त्याचवेळी ट्रेलर क्र एमएच ४३ बीएक्स ६३५९ वरील चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रेलर भरधाव वेगाने चालवून समोरून येत असलेल्या रिक्षेला जोरदार धडक दिली.
यामध्ये रिक्षामधील प्रवाशी प्रभावती पाटील आणि रिक्षाचालक नवीद नदाब शेख (रा. कल्याण) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रेलरचालक फरार झाला असून पनवेल शहर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.